Ram Navmi

श्रीराम नवमी शोभायात्रा परिवाराचे सदस्य होण्याकरिता – 7738610028

आमच्याविषयी

Home / About Me

राम नवमी शोभायात्रेच्या अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे!

प्रभू श्री रामचंद्रांप्रती असलेल्या प्रेम, समर्पणाच्या भावनेतून आम्ही सर्व रामभक्त अत्यंत श्रद्धेने सामाजिक, धार्मिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी राम नवमी दिवशी श्रीरांमांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राचे आयोजन समिती करते. विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र करून भक्तीमय वातावरणात राम नवमीचा उत्सव साजरा केला जातो.शोभायात्रा म्हणजे समाजाला एकत्रित करण्याचा उपक्रम आहे.रामाची आदर्श जीवनपद्धती, त्यांचे कार्य लोकांपर्यंत यातून पोहचवले जाते. या शोभायात्रेत सगळ्या जातीतली माणसं भक्तिभावाने अंतकरणाने श्रीरामांशी जोडलेले असल्याने त्यांचे जीवन समृद्ध होते. आम्ही सर्व रामभक्त या शोभायात्रेचा उद्देश सफल व्हावा यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करतो. श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची माहिती यातून सर्वांना मिळते. तसेच आपल्या जीवनात सकारात्मकता वाढून राष्ट्राचे ऐक्य अबाधित रहावे हा आमचा संकल्प आहे.

सहभागी का व्हावे ?

राम नवमीचा दिवस प्रत्येक हिंदू कुटुंबासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे. श्रीरामचंद्रांचे आदर्श आणि उपदेश जगभरातील भक्तांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात. आम्ही आपल्या राम नवमी शोभायात्रेचे आयोजन एका विशेष पद्धतीने करत असल्याने आपला अनुभव भक्तिमय होईल. या शोभायात्रेत सामाजिक आणि धार्मिक संदेशाच्या माध्यमातून समाजात शांती आणि एकतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्तिरसाचा अद्वितीय अविष्कार या शोभायात्रेत आपल्याला अनुभवायला मिळतो. भक्तांच्या सुरक्षेची संपूर्णपणे काळजी घेतली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे विशेष लक्ष दिले जाते. शोभायात्रेदरम्यान आलेल्या भक्तांना श्रीरामांच्या आशीर्वादाबरोबरच महाप्रसादाचा लाभ घेता येतो. श्रीरामांची दिव्य शक्ती आणि आपल्या अखंड भक्तीच्या संगमाने शोभायात्रेचं पावित्र्य जपून, आलेला प्रत्येक माणूस तल्लीन होऊन जातो, यात मात्र शंका नाही.

ध्येय आणि उद्दिष्ट

प्रभू श्रीरामांच्या जीवनपद्धतीचा आदर्श समोर ठेवून लोकांना आध्यात्मिक अनुभूती मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही समता आणि करूणेचा संदेश प्रत्येक वयोगटापर्यंत पोहचवू इच्छितो. या पवित्र सोहळ्याचा अनुभव देऊन समाजामध्ये सामाजिक एकता आणि धार्मिक सौहार्द कायम ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे. या शोभायात्रेच्या माध्यमातून श्रीरामांनी सांगितलेली मानवतावादी उद्दिष्ट परिपूर्ण करत जनमानसात धार्मिक सलोखा टिकावा यासाठी प्रयत्न करतो. राम नवमी शोभायात्रा हा केवळ धार्मिक उत्सव नसून त्यामध्ये मानवी मूल्ये, प्रेम आणि त्याग यांचा संगम पहावयास मिळतो. श्रीराम नवमी शोभा यात्रा वागळे समिती जि. ठाणे हे सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक बनवणे आमचे मुख्य ध्येय आहे.तसेच भक्तिभाव आणि सांस्कृतिक ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या भक्तिपूर्ण उपस्थिती आणि योगदानाने या शोभायात्रेचा उद्देश परिपूर्ण होण्यास मदत होईल

आम्ही काय करतो

राम नवमीचं हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो. गेली अनेक वर्षे राम नवमीनिमित्ताने शोभायात्राचे आयोजन श्रीराम नवमी शोभा यात्रा वागळे समिती जि. ठाणेद्वारे केले जात आहे. प्रभू श्रीरामांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या शोभायात्रेचा आहे. विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून होते. विविध संगीत, नृत्य यांच्या अविष्काराने भगवान श्रीरांमाचे जीवन नाटयरूपी सादर केले जाते. यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यातील जिव्हाळापूर्ण नात्याचे दर्शन घडते.संपूर्ण शोभायात्रेत पारंपरिक भजन, जय श्री राम यांच्या उद्घोषाने वातावरणात प्रसन्नता आल्याने साक्षात प्रभू श्रीरांमांचाच आशीर्वाद या प्रसंगी मिळतो. शोभायात्रा एक नवा उत्साह आणि आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे.कार्यक्रमात प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचा अगाध महिमा आपल्याला पहावयास मिळतो. आपल्या सांस्कृतिक परंपरेचे पालन करणारे अनेक सह्दयजन यामध्ये सहभागी होऊन एका मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार होतात.