श्री रामनवमी शोभायात्रा वागळे समिती जि. ठाणे, या शोभायात्रेचे आयोजन करते. दरवर्षी राम नवमी निमित्त श्रीरामांच्या आदर्श चारित्र्याची शिकवण या शोभायात्रेच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहचवण्याचे समितीचे ध्येय आहे.
प्रभू श्री रामचंद्रांप्रती असलेल्या प्रेम, समर्पणाच्या भावनेतून आम्ही सर्व रामभक्त अत्यंत श्रद्धेने सामाजिक, धार्मिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी राम नवमी दिवशी श्रीरांमांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राचे आयोजन समिती करते. विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र करून भक्तीमय वातावरणात राम नवमीचा उत्सव साजरा केला जातो.शोभायात्रा म्हणजे समाजाला एकत्रित करण्याचा उपक्रम आहे.रामाची आदर्श जीवनपद्धती, त्यांचे कार्य लोकांपर्यंत यातून पोहचवले जाते. या शोभायात्रेत सगळ्या जातीतली माणसं भक्तिभावाने अंतकरणाने श्रीरामांशी जोडलेले असल्याने त्यांचे जीवन समृद्ध होते. आम्ही सर्व रामभक्त या शोभायात्रेचा उद्देश सफल व्हावा यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करतो. श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची माहिती यातून सर्वांना मिळते. तसेच आपल्या जीवनात सकारात्मकता वाढून राष्ट्राचे ऐक्य अबाधित रहावे हा आमचा संकल्प आहे.
श्रीराम नवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ज्यात श्रीरामाच्या जीवनाचे आणि विचारांचे स्मरण केले जाते.आपल्या शहराच्या संस्कृतीला साजेशी असणाऱ्या आणि ऐतिहासिक परंपरा जपणारी राम नवमी शोभायात्रा २०१६ पासून सुरू आहे, सुरूवातीला फक्त १०० जणांनी सुरू केलेल्या शोभायात्रेला येणाऱ्यांची संख्या आता हजारच्या पटीत आहे. गेल्या वर्षी दहा हजार सदस्य नोंदणी झाली.अनेक अडथळ्यांवर मात करत शोभायात्राची सुरूवात केली. हिंदुत्वासाठी एकत्रित आलेल्या तरूणांनी श्रीराम नवमी शोभा यात्रा वागळे समिती, ठाणे या समितीची स्थापना केली. दरवर्षी हजारो रामभक्त श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. रामनवमी शोभायात्रा हा एक भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे, जो आपल्या समाजामध्ये एकता, प्रेम आणि श्रद्धेची भावना निर्माण करतो.
या वर्षी दि ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व रामभक्तांनी लवकरात लवकर रामनवमी शोभायात्रेचे सदस्य होऊन श्रीराम जन्मोत्सवाच्या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती.